रिंगरोडसाठी पुन्हा नोटीफिकेशन काढण्यात आल्यामुळे शेतकऱयांमध्ये भीती : इंग्रजी-कन्नड दैनिकामध्ये प्रसिद्ध झाल्याने शेतकऱयात संताप
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडसाठी पुन्हा नोटीफिकेशन काढण्यात आल्यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांनी जे नोटीफिकेशन काढले आहे ते एका इंग्रजी आणि कन्नड दैनिकामध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषिक असलेल्या या संपूर्ण भागातील जनतेला याची कोणतीची माहिती नाही. यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठी बहुभाग असलेल्या गावांच्या शिवारातून हा रिंगरोड होत आहे. मात्र मराठी वृत्तपत्रांमध्ये हे नोटीफिकेशन देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱयांना याची माहितीच नाही.
या रिंगरोडमध्ये अगसगा येथील सर्व्हे क्रमांक 148, 149, 151, 156, 157, 158, 159, 160, 161, 163, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 27, 28,
आंबेवाडी – सर्व्हे क्रमांक 65, 66, 67, 68, 69, 71,
बाची – सर्व्हे क्रमांक-10, 101, 11, 13, 15, 16, 17, 18, 23, 26, 27, 28, 29, 31, 8, 9
बहाद्दरवाडी -सर्व्हे क्रमांक-32, 62, 64, 65-ए, 68, 69, 71, 72-ए, 72-बी, बेळगुंदी 135, 136, 145, 146, 147, 148, 149, 189, 190, 191, 209, 210, 211, 254, 255, 256, 261, 262, 263, 264, 268, 269, 270, 274, 275, 303-ए, 304, 307, 308, 310, 311, 312, 315, 316, 326, 327, 332, 376,
बिजगर्णी -सर्व्हे क्रमांक 219, 220, 224, 225, 226, 231, 233, 272, 273, 274, 275, 276, 287, 291, 292, 293, 295, 296, 297, 302, 303,
गोजगे -सर्व्हे क्रमांक- 10, 127, 134, 135, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 16, 17, 18, 20, 21,
होनगा -सर्व्हे क्रमांक– 269, 270, 271, 272, 273, 274, 275, 315, 318, 320, 321, 322, 323, 347, 348, 349, 350, 351, 352, 353, 354, 355, 356, 357, 358, 359, 360, 361, 362, 363, 364, 365, 366, 367, 368, 369, 370, 371, 372, 373, 374, 381, 382, 383, 384, 406, 407, 408, 409, 440, 441, 442, 444, 445, 446, 447, 448, 449, 450, 451, 452, 453, 454, 455, 457, 458, 460, 462, 463, 464, 465, 466, 488, 489, 499, 500, 501,
कडोली-सर्व्हे क्रमांक- 10, 107, 108, 11, 110, 112, 117, 118, 119, 12, 120, 121, 129, 13, 21, 22, 24, 25, 27, 28, 29, 32, 545, 546, 548, 549, 570, 571, 581, 582, 583, 584, 585, 587, 588, 589, 590, 591, 592, 593, 597
काकती-सर्व्हे क्रमांक- 176 वनविभाग, 92, 94, 98 वनविभाग.
कलखांब-सर्व्हे क्रमांक- 10, 19, 20, 207, 208, 209, 21, 210, 211, 212, 213, 214, 215, 23, 24, 25, 7, 8, 9
कल्लेहोळ-सर्व्हे क्रमांक-259, 288, 289, 293, 294, 295, 296, 297, 298, 299, 303 या सर्व्हे क्रमांकामधील जमिनी संदर्भात नोटीफिकेशन देण्यात आले आहे. याचबरोबर खमकारट्टी, कणबर्गी कोंडसकोप्प, मण्णूर, मास्तमर्डी, मुचंडी, मुतगा, नावगे, संतिबस्तवाड, शगमनहट्टी, शिंदोळी, सोनट्टी, सुळगा येळ्ळूर, तमनायकनहट्टी-धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळ, येळ्ळूर, झाडशहापूर गावाच्या शिवारातील जमिनी या नोटीफिकेशनमध्ये देण्यात आल्या आहेत. रविवार दि. 16 रोजी खमकारट्टी, कणबर्गी, कोंडसकोप्प, मण्णूर, मास्तमर्डी, मुचंडी, मुतगा, नावगे, संतिबस्तवाड या गावचे सर्व्हे क्रमांक आम्ही प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर सोमवार दि. 17 रोजी शगमनहट्टी, शिंदोळी, सोनट्टी, सुळगा-येळ्ळूर, तमनायकनहट्टी-धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळ, येळ्ळूर आणि झाडशहापूर या गावचे सर्व्हे क्रमांक प्रसिद्ध केले जाणार आहेत.
क्रमश…