Tarun Bharat

बिगर मान्यताप्राप्त मदरशांचे होणार सर्वेक्षण

Advertisements

योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था  / लखनौ

उत्तरप्रदेश सरकारने बिगरमान्यताप्रापत मदरशांमध्ये मूलभूत सुविधांच्या स्थितीची पडताळणी करण्यासाठी सर्वेक्षण करविण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्वेक्षण लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री दानिश आझाद अंसारी यांनी दिली आहे.

सर्वेक्षणात मदरशाचे नाव, त्याचे संचालन करणाऱया संस्थेचे नाव, मदरशाची इमारतीची मालकी, विद्यार्थ्यांची संख्या, पेयजल, फर्निचर, वीजपुरवठा तसेच शौचालयाची व्यवस्था, शिक्षकांची संख्या, मदरशात लागू अभ्यासक्रम, मदरशाच्या उत्पन्नाचा स्रोत तसेच कुठल्याही संस्थेशी मदरशाच्या संलग्नतेविषयी माहिती गोळा केली जाणार असल्याचे अंसारी यांनी सांगितले आहे.

राज्यात सध्या 16 हजार 461 मदरशांचे संचालन केले जात असून यातील 560 मदरशांना शासकीय अनुदान प्राप्त होते. राज्यात मागील 6 वर्षांपासून नव्या मदरशांना अनुदान यादीत सामील करण्यात आलेले नाही.

Related Stories

”…तर तालिबान्यांना सडेतोड उत्तर देऊ” – जो बायडेन

Abhijeet Shinde

रामायण एक्स्प्रेसमधील गणवेशावरून वाद

Patil_p

काशी विश्वनाथ मंदिरात होणार कॅबिनेट बैठक

Patil_p

कोरोना मृत्यूदरात घट, स्वास्थ्यदरात वाढ

Patil_p

कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांचे निधन

datta jadhav

लोकसंख्या नियंत्रणासाठी तूर्तास कायदा नाही!

Patil_p
error: Content is protected !!