Tarun Bharat

कॅन्टोन्मेंटमधील मालमत्तांचे ड्रोन कॅमेऱयाद्वारे सर्वेक्षण

कॅन्टोन्मेंट बैठकीत निर्णय : दंड वसुलीलाही हिरवा कंदील

प्रतिनिधी /बेळगाव

कॅन्टोन्मेंटला मिळणाऱया निधीमधून विविध विकासकामे राबविण्यासह कचरा उचल करण्यासाठी वाहने आणि उपकरणे खरेदी करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीसाठी कारवाई करण्यासह दंड वसूल करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला. कॅन्टोन्मेंटच्या मालमत्तेची माहिती घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱयाद्वारे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा ब्रिगेडिअर जायदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने विविध विषयावर चर्चा करताना विकासकामे राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्य शासनाकडून एसएफसी योजनेंतर्गत 33 लाख आणि सीएफसी योजनेमधून 85 लाखाचे अनुदान मंजूर केले आहे. याअंतर्गत विविध विकासकामे राबविण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. थिम्मय्या रोडसह विविध रस्त्याच्या डांबरीकरणास मंजुरी देण्यात आली. कचरा वाहू वाहन आणि स्वच्छतेसाठी लागणारी यंत्रपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ओल्ड मोची रोड परिसरातील डेनेज वाहिन्या दुरूस्ती करण्यास हिरवा कंदील बैठकीत दाखविण्यात आला.

…तर दंडात्मक कारवाई करणार

थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासाठी दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मुदतीत घरपट्टी जमा केली नसल्यास दि. 1 ऑक्टोबरपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पाणीपट्टी भरली नसल्यास नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहे. त्यामुळे सदर कारवाई करण्याबाबत चर्चा करून थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ठोस कारवाई करण्यास मंजुरी दिली. कॅन्टोन्मेंट बोर्डची संपूर्ण मालमत्ता व जागेची माहिती घेण्याचा आदेश केंद्र शासनाने बजावला आहे. मालमत्तांचे ड्रोन कॅमेऱयाद्वारे सर्वेक्षण करून माहिती जमा केली जाणार आहे. तसेच मालमत्तावर झालेले अतिक्रमण, जागेवर झालेल्या बांधकामाची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच ड्रोन कॅमेऱयाद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद, कार्यालय अधीक्षक एम. वाय. ताळूकर, अभियंते सतिश मण्णूरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

जन्म-मृत्यूची नोंद नसल्याने आश्चर्य…

कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयातील जन्म-मृत्यूच्या आढाव्याची माहिती अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी घेतली. रुग्णालयात जन्म-मृत्यूची नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. किमान कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांना रुग्णालयात औषधोपचार घेणे आवश्यक असल्याचे म्हणाले. रुग्णालय असूनही कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी खासगी रुग्णालयात औषधोपचार घेवून बिले क्लेम करीत असतात. त्यामुळे प्रथम कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखवून याठिकाणी उपचार होत नसल्यास अन्य ठिकाणी औषधोपचार घेण्याची सूचना करावी. तसेच कर्मचाऱयांना रुग्णालयात उपचार घेण्याच्या सक्तीचा आदेश ब्रिगेडिअर मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांना दिला.

Related Stories

लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू

Patil_p

मार्चपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा दावा

Amit Kulkarni

बेळगावात बुधवारी चौघांची आत्महत्या

Amit Kulkarni

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तहकूब होण्याची शक्यता

Archana Banage

राजहंसगडावरील शिवपुतळय़ाबाबत दबावतंत्र

Patil_p

लोकमान्य ग्रंथालय आजपासून पूर्ववत सुरू

Amit Kulkarni