वृत्तसंस्था/दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आघाडीच्या सुर्यदत्ता बिझनेस फोरमतर्फे भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. येथे या फोरमतर्फे हा पुरस्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.
या फोरमचे अध्यक्ष संजय चोरडीया तसेच उपाध्यक्षा सुषमा चोरडीया व सुर्यदत्ता शैक्षणिक संस्था, पुण्याचे प्रमुख अधिकारी अक्षित कुशल यांच्या हस्ते सायना नेहवालला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल सायना नेहवालने या फोरमचे आभार मानले आहेत. परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपल्याला मोठे ध्येय साध्य करता येते तसेच तिने देशातील युवा पिढीला प्रोत्साहन दिले