वाळवा / वार्ताहर
सुर्यगाव येथील सागर महादेव सुर्यवंशी (वय ३६) हा तरूण कृष्णा नदीकाठी पोहताना दम लागून बुडाला आहे. आज दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरूण सुर्यगावच्या पाणवठ्यावरून बुर्लीच्या बाजूला पैलतीरावर पोहत आला. मात्र पैलतीर वीस तीस फुट अंतरावर राहिला असतानाच दम लागून तो बुडू लागला. हि बाब सुर्यगावच्या पाणवठ्यावरून पाहणाऱ्या जयकर रणनवरे, रोहन सुर्यवंशी, प्रथमेश सुर्यवंशी, श्रेयश सुर्यवंशी, संकेत सुतार, ओम रकटे या तरूणांनी पाण्यात उड्या टाकून वाचवण्यासाठी धाव घेतली.
मात्र बुर्लीच्या पैलतीरावर पोहचेपर्यंत सागर बुडाला होता. तरूणांनी बराच वेळ शोध घेऊनही तो सापडू शकला नाही. यानंतर आमणापूर ग्रामपंचायतीच्या बोटीसह भारती रेस्क्यू टिमचे गजानन नरळे यांनी घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम राबविली.
आज शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरूण सुर्यगावच्या पाणवठ्यावरून बुर्लीच्या बाजूला पैलतीरावर पोहत आला. मात्र पैलतीर वीस तीस फुट अंतरावर राहिला असतानाच दम लागून तो बुडू लागला.
हि बाब सुर्यगावच्या पाणवठ्यावरून पाहणाऱ्या जयकर रणनवरे, रोहन सुर्यवंशी, प्रथमेश सुर्यवंशी, श्रेयश सुर्यवंशी, संकेत सुतार, ओम रकटे या तरूणांनी पाण्यात उड्या टाकून वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र बुर्लीच्या पैलतीरावर पोहचेपर्यंत सागर बुडाला होता. तरूणांनी बराच वेळ शोध घेऊनही तो सापडू शकला नाही. यानंतर आमणापूर ग्रामपंचायतीच्या बोटीसह भारती रेस्क्यू टिमचे गजानन नरळे माजी उपसरपंच सचिन पाटील, वैभव उगळे यांनी घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम राबविली. गावातील तरूणासह नरळे यांची संध्याकाळी उशिरा पर्यंत ही शोधमोहीम सुरु होती. सागर याच्या घरी आई, पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती