ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारत आणि न्यूझीलंड (india v new zealand) यांच्यात दुसरा टी-२० सामना न्यूझीलंडच्या माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ३ गडी गमावून १९१ धावा केल्या आहेत. दरम्यान, सुर्यकुमार यादव (surykumar yadav) टी-२० मध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये उत्कृष्ट शतक झळकावले. तसेच २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ११०० धावा पूर्ण झाल्या आहेत.
सूर्यकुमार यादवने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्याने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. त्याच्याशिवाय इशान किशनने सर्वाधिक ३१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. सूर्या ५१ चेंडूत १११ धावा करून नाबाद राहिला. त्याने ११ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज टीम साऊदीने २० व्या षटकात हॅट्ट्रिक घेत भारतीय धावसंख्या २०० धावांपर्यंत पोहोचू दिली नाही.
दरम्यान, एका टोकाला विकेट पडत असताना सूर्यकुमार यादवने डावाची जबाबदारी स्वीकारली आणि वेगवान धावा केल्या. श्रेयस अय्यर ९ चेंडूत १३ धावा करुन बाद झाला. त्याचवेळी कर्णधार हार्दिकने १३ चेंडूत १३ धावा केल्या. दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खातेही उघडता आले नाही. अखेरीस, सूर्यकुमार यादव ५१ चेंडूत १११ धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार मारले. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने सहा गडी गमावून १९१ धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले.