Tarun Bharat

सूर्यकुमार यादवला सर्वोत्तम दुसरे मानांकन

Advertisements

आयसीसी टी-20 मानांकन यादी घोषित

दुबई / वृत्तसंस्था

भारताचा मध्यफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-20 मानांकन यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान प्राप्त केले. रविवारी हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपन्न झालेल्या तिसऱया टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावांची सामना जिंकून देणारी खेळी साकारली आणि त्याच्या खात्यावर आता 801 गुण नोंदवले गेले आहेत.

यंदा ऑगस्ट महिन्यात सूर्यकुमार यादवला प्रथमच टी-20 मानांकनात द्वितीय स्थानी झेपावता आले होते. त्यानंतर या वर्षात द्वितीय स्थानी झेपावण्याची त्याची ही दुसरी वेळ ठरली. त्यावेळी विंडीजविरुद्ध धमाकेदार खेळीच्या बळावर त्याने ही झेप घेतली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱया व तिसऱया टी-20 सामन्यात अनुक्रमे नाबाद 46 व 17 धावा जमवणारा रोहित शर्मा 13 व्या स्थानी राहिला. विराट कोहली आता 15 व्या स्थानी आहे. केएल राहुलचे स्थान मात्र 4 अंकांनी घसरले आणि तो 22 व्या स्थानी फेकला गेला. सूर्यकुमार यादव व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात फक्त काही गुणांचा फरक असून बाबर आझम सरस कामगिरीसह तिसऱया स्थानापर्यंत पोहोचला आहे.

बाबर आझमने 1155 दिवसांपूर्वी मानांकन यादीत अव्वलस्थान मिळवले होते. या महिन्यात त्याचाच संघसहकारी मोहम्मद रिझवानने ही जागा काबीज केली. रिझवान यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यात नाबाद 110 धावांच्या खेळीसह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. नंतर तिसऱया व चौथ्या सामन्यात त्याने अनुक्रमे 8 व 36 धावा जमवल्या.

गोलंदाजी मानांकन यादीत फिरकीपटू अक्षर पटेल 18 व्या, यजुवेंद्र चहल 26 व्या तर मध्यमगती-जलद गोलंदाज हर्षल पटेल 37 व्या स्थानी आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हॅझलवूड अव्वलस्थानी विराजमान आहे. भुवनेश्वर कुमारला मात्र खराब कामगिरीचा फटका बसला असून तो दहाव्या स्थानी फेकला गेला आहे.

Related Stories

जडेजा सुपर किंग ! विराट सेनेचा विजयरथ रोखला !

Archana Banage

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा जिममध्ये सराव

Patil_p

लियांडर पेसच्या वेबसाईटचे उद्घाटन नवी दिल्लीत

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजच निर्णायक ठरतील

Patil_p

रोहितच्या टी-20 मध्ये दहा हजार धावा पूर्ण

Amit Kulkarni

जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत शिवा थापा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!