Tarun Bharat

सूर्यकुमार यादव मानांकनात दुसऱया स्थानी

Advertisements

दुबई : भारतीय संघातील वरच्या फळीत खेळणारा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने आयसीसीच्या ताज्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. सूर्यकुमार यादवचे स्थान तीन अंकांनी वधारले आहे. यापूर्वी तो या मानांकनात पाचव्या स्थानावर होता.

सध्या भारतीय क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱयावर टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या तिसऱया सामन्यात सूर्यकुमार यादवने 44 चेंडूत 76 धावांची खेळी केल्याने या मानांकन यादीत त्याने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकन यादीत पाकचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम यांच्यात आता केवळ 2 गुणांचा फरक आहे. बाबर आझम 818 गुणांसह पहिल्या तर सूर्यकुमार यादव 816 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.

Related Stories

ऐश्वर्य तोमरचा नवा विश्वविक्रम, नाम्या कपूरला सुवर्ण

Patil_p

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून जपानच्या मोमोटाची माघार

Amit Kulkarni

‘क्लीन स्वीप’ हा विराटसेनेचा निर्धार

Patil_p

इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी

Patil_p

कझाकमधील टेटे स्पर्धेत सिद्धेश-मुदितला कांस्य

Patil_p

बोपण्णा-रामकुमार उपांत्य फेरीत, सानिया पराभूत

Patil_p
error: Content is protected !!