Tarun Bharat

रणजी सामन्यात सूर्यकुमारची फटकेबाजी, जैस्वाल-रहाणे यांची शतके

वृत्तसंस्था/ मुंबई

येथील बांद्रा-कुर्ला क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील  हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाकडून खेळणाऱया सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 80 चेंडूत 90 धावा झोडपल्या. सूर्यकुमारच्या खेळीमध्ये 1 षटकार आणि 15 चौकाराचा समावेश आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल (162) व अजिंक्य रहाणे (नाबाद 139) यांनी शतके नोंदवली.

मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर मुंबईने 63 षटकात 2 बाद 326 धावा जमवल्या. मुंबईचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ केवळ 19 धावावर बाद झाला. हैदराबादच्या काकने शॉला बाद केले. 2021-22 रणजी हंगामात मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मध्यप्रदेशने अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करून रणजी चषकावर आपले नाव कोरले होते. 2022 क्रिकेट हंगामात टी-20 प्रकारामध्ये सूर्यकुमार यादवची फटकेबाजी सातत्याने झाली. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शशांकने सूर्यकुमार यादवला पायचित केले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला. मुंबईने दिवसाअखेर 63 षटकात 2 बाद 326 धावा जमवल्या. या वर्षीच्या क्रिकेट हंगामात सूर्यकुमार यादवने टी-20 च्या 31 सामन्यात 1164 धावा जमवल्या असून त्यामध्ये 2 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या या प्रकारात सूर्यकुमार याने सर्वाधिक धावा जमवण्याचा पराक्रम केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये मात्र त्याला अशी कामगिरी करता आली नाही. त्याने 2022 कालावधीत 13 सामन्यात केवळ 260 धावा जमवल्या असून त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने 77 सामन्यातील 129 डावात 5326 धावा जमवल्या असून त्यामध्ये 14 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 200 धावा ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आहे.

Related Stories

हॉकी मानांकनात वर्षअखेरीस भारत चौथ्या स्थानी

Patil_p

व्हेगातर्फे पोलिसांना पीपीई किटस्, मास्क

Patil_p

बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद शरीफ निवृत्त

Patil_p

बांगलादेशला हरवून इंग्लंडची विजयी सलामी

Patil_p

आशिया चषक महिलांची फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतात

Amit Kulkarni

दोन गटात रंगणार यंदाची आयपीएल

Patil_p