Tarun Bharat

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात NCB कडून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण (Sushant Singh Rajput Suicide Case) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या (Riya Chakravarthi) अडचणी वाढणार आहेत. NCB ने रियावर सुशांतच्या आत्महत्येचा ठपका ठेवला आहे. दरम्यान, एनसीबीने न्यायालयात या प्रकरणातील आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर करून थेट रिया चक्रवर्तीवर ठपका ठेवला आहे. त्याच बरोबर सुशांतला ड्रग्ज पुरविलेआणि ड्रग्जचे व्यसन लावण्यातही रियाचा हात होता असा दावा या मसुद्यात करण्यात आला आहे.

बॉलिवूड मधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला त्या घटनेला जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली तरीही त्या प्रकरणाचा अद्याप पूर्ण छडा लागलेला नाही. या प्रकरणासंदर्भांत अनेक घडामोडी सुद्धा घडल्या, अनेक चर्चा सुद्धा सुरु होत्या. पण काही काळानंतर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण चर्चेतून पूर्णतः विलग झाले. पण आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पुरवणी आरोपपत्र सादर केले असून त्यात सुशांतला त्याची प्रेयसी रिया चक्रवतीसह इतर आरोपींनी ड्रग्ज पुरविल्याचा आरोप केला आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्येसह ड्रग्जचा तपास सीबीआयसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरू आहे. याच प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 35 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले असून त्यात रियासह तिचा भाऊ शौविक आणि इतर ३४ आरोपींवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३४ जणांविरुद्ध उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये आणि बॉलिवूडमधील लोकांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप लावला आहे. यातच मयत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यालाही नशा करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.

रिया चक्रवर्तीवर एनसीबीने कोणते आरोप लावलेत?
एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध आरोप लावले आहेत की, तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केले आणि त्याचे पैसेही तिने दिले. एनसीबीने ३४ आरोपींविरुद्ध ३८ आरोप केले आहेत. एनसीबीने आरोपपत्रात दावा केला आहे की, रिया चक्रवर्तीने सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती, दीपेश सावंत आणि दुसऱ्या व्यक्तींकडून अनेकदा गांजा खरेदी केला. गांजा खरेदी केल्यानंतर रिया चक्रवर्तीने तो सुशांत सिंह राजपूतला दिला.

Related Stories

‘अरुवी’च्या हिंदी रिमेकमधून फातिमा बाहेर

Patil_p

स्कॉटलंडचा बांगलादेशला पराभवाचा धक्का!

Patil_p

‘कोर्ट’ सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

Rohan_P

गोवा शिवसेनेकडून नऊ उमेदवारांची घोषणा

Sumit Tambekar

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडीने पुढे नेला : बाळासाहेब थोरात

Sumit Tambekar

चीनमध्ये महापूर; गर्भवतीने वाहत्या पाण्यात टायरवर दिला बाळाला जन्म

datta jadhav
error: Content is protected !!