Tarun Bharat

लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयिताला अटक

सहा दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिनिधी /पणजी

युवतीची फसवणूक करून तिला गोव्यात आणली व तिच्यावर लैंगिक अत्याच्यार केला व नंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱया संशयिताला येथील महिला पोलीस स्थानकाने गुजराथ येथे जाऊन संशयिताला अटक केली आहे. संशय़िताच्या विरोधात भादंसं 370, 370(ए), 376, 377, 506(2), 324, तसेच आयटीपी कायदा कलम 4,5,6,7, आयटी कायदा 66(इ) कलमाखाली  गुन्हा नोंद केला आहे.  याबाबत पीडित युवतीने तक्रार दाखल केली होती. संशयिताला गोव्यात आणल्या नंतर सोपस्कर पूर्ण करून संशयिताला न्यायालयात हजार केले असता, सहा दिवसांची  पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे नाव अनंत कुमार ठक्कर असे  असून तो गुजराथ येथली आहे. संशयिताने पीडित युवतीची फसवणूक करून गोव्यात आणली. तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले तसेच तीचा व्हिडीओ काढला आणि त्याच्या आधारे पीडित युवतीला धमकावणे सुरु केले. तिच्यावर अनेकवेळी लैंगिक अत्याचार केले. नंतर तिला वेश्या व्यवसयासाठी पाठविण्याचाही प्रयत्न केला मात्र पीडित युवतीने नकार दिल्याने तिला धमकावणे तसेच मारहाण करणे सुरु केले. ही घटाना नोव्हेंबर 2021 ते जुलै 2022 या काळात घडली आहे. अखेर पीडित युवतीने महिला पोलीस स्थानक गाठले आणि संशयिताच्या विरोधात तक्रार दाखल केली. महिला पोलीस स्थानकाचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक संध्या गुप्त आणि त्यांच्या पोलीस पथकाने गुजराथ येथे जाऊन संशय़िताला अटक केली.

Related Stories

नोकऱयांची आश्वासने हा खोटारडेपणाचा कळस

Patil_p

मगो पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार सोपटेंनी आणले विघ्न

Patil_p

संसार चालविणे आणि सायकलिंग यांच्यात बरेच साम्य

Amit Kulkarni

सहवेदना जिजाबाई पाटील

Amit Kulkarni

तब्बल 20 वर्षांनी वेरे गटारांची दुरुस्ती

Patil_p

“काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू ”

Abhijeet Khandekar