प्रतिनिधी / पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणातील संशय़िताला हैद्राबाद येथे अटक केली आहे. सोपस्कर पूर्ण करून गोव्यात आणले. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशय़िताचे नाव महेश गौड रंगा (27 हैद्राबाद तेलंगणा) असे आहे. काही दिवसापूर्वी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत यशवंत रेड्डी याला अटक केली होती. त्याची सखोल चौकशी केली असता यशवंत रेड्डी गोव्यात विकत असलेला डॅग्ज हैद्रबाद येथून आणत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार सीआयडी पोलिसांनी हैद्राबाद येथे एक पोलीस पछक पाठवून महेश गौड रंगा याला अटक केली आहे. सीआयडी पोलीस पुढल तपास करीत आहे.