Tarun Bharat

बेती गुऊद्वारा चोरी प्रकरणी संशयित दिल्लीत जेरबंद

पर्वरी पोलिसांची कारवाई, ‘सीसीटीव्ही’द्वारे पटली होती ओळख, दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू

प्रतिनिधी /पर्वरी

बेती येथील श्री गुऊ गोविंद सिंग सभा गुऊद्वारामध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पर्वरी  पोलिसांनी एका संशयित आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव जसप्रीत सिंग, (35), रा. चांदनगर, पश्चिम दिल्ली असे असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुऊद्वाराच्या अध्यक्षांनी ता. 18 रोजी तक्रार दाखल केली होती. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी दरबार हॉलमध्ये प्रवेश करून दानपेटी फोडली आणि रोख रक्कम अंदाजे 4,50,000/- रुपये लंपास होते. पोलिसांनी कलम भा. द. क्र. 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे विविध पथके तयार करून 3 दिवस सीसीटीव्ही पॅमेऱ्यांचे विश्लेषण केले. पुढील विश्लेषण आणि तांत्रिक निरीक्षणाच्या आधारे एक दोन अज्ञात आरोपींची ओळख पटली आणि आरोपींपैकी एक पश्चिम दिल्लीचा असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांचे पथक ताबडतोब दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सहकार्याने संशयित आरोपीला अटक करून गोव्यात आणले. दुसऱ्या आरोपीचीही ओळख पटली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.चोरीच्या रकमेच्या वसुलीसाठी आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. संपूर्ण तपास  उत्तर गोवा पोलिस अधीक्षक  निधिन वाल्सन, उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दिल्लीत गेलेल्या तपास पथकात उपनिरीक्षक सीताराम मलिक, महिला उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर, पोलीस कर्मचारी नितेश गौडे, वारीश कुंकळीकर, योगेश शिंदे, आनंद कंदुर्गी आणि नितेश परब यांचा समावेश होता.

Related Stories

पिस्तुलातून चुकून सुटलेल्या गोळीने बालक गतप्राण

Amit Kulkarni

‘श्री गवळादेवी’चा आज पासून जत्रोत्सव

Amit Kulkarni

अकरा खैर तस्करांच्या आवळल्या मुसक्या

Amit Kulkarni

मुरगावात भाजपाला कथीत वासनाकांड भोवले

Amit Kulkarni

जेटी सडा येथील नागरिक बेपत्ता

Amit Kulkarni

मोपसह दाबोळी सुरूच राहील

Amit Kulkarni