Tarun Bharat

सांगली जिल्हा कारागृहातुन कैदी पळाला, खुनातील संशयीत पळाल्याची तक्रार दाखल

Advertisements

तासगाव खून प्रकरणांमध्ये संशयीत रविवारी सकाळी सव्वा सात वाजता पळाला

sangli- सांगली-तासगाव येथे जेसीबी चालकाचा खून करणारा संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. येळगोड ता. सिंदगी जि. विजापूर) हा रविवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास जिल्हा कारागृहातून पळाला आहे. त्याबाबत कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलीस ठाण्यात तो पळून गेल्याची तक्रार दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सुनील हा जेसीबी मालक हरी येडुपल पाटील रा. मंगसुळी यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. मालक हरी पाटील यांनी सुनील याची पत्नी पार्वती हिच्या अंगावर हात टाकला होता. त्यामुळे चिडून जावून सुनील आणि त्याच्या पत्नीने आठ जून २०२१ रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निर्घुण खून करून हा मृतदेह विहिरीत टाकला होता. या प्रकरणांचा तपास तत्कालिन स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने करून सुनील आणि त्याची पत्नी पार्वती हिला अटक केली होती. सुनील हा सांगली कारागृहात जेरबंद आहे. रविवारी सकाळी त्यांने कारागृहातून पळ काढला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीसांच्याकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

Related Stories

सीमाप्रश्नाची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर

Nilkanth Sonar

“राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा”

Abhijeet Shinde

आर हरी कुमार यांनी स्विकारली नौदल प्रमुखपदाची सूत्रे

datta jadhav

युवराज सिंग कडून दिल्ली सरकारला 15 हजार एन-95 मास्कची मदत

prashant_c

मराठा बँकेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

Nilkanth Sonar

कर्नाटक: पूरग्रस्त भागातून ३१ हजार ३६० लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर: मंत्री आर. अशोक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!