ऑनलाईन टीम / तरुण भारत :
प्रसिद्ध पार्श्वगायक KK उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (वय 53) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा आढळल्याने न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढलं आहे.
कोलकात्यात गुरुदास कॉलेजतर्फे आयोजित नजरूल मंच कार्यक्रमात KK यांनी मंगळवारी रात्री सादरीकरण केले. त्यानंतर ते हॉटेलवर परतले. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने साडेदहा वाजता रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर वाटेतच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता KK यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस KK यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांची संमती मिळाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. एसएसकेएम रुग्णालयात त्यांच्या पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल.