Tarun Bharat

जळगाव दूध संघ निवडणुकीची स्थगिती उठवली; 10 डिसेंबरला मतदान

जळगाव / प्रतिनिधी :

Jalgaon District Milk Union elections जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण देत 20 डिसेंबरपर्यंत स्थगित केली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, नियोजित दिवशीच म्हणजे 10 डिसेंबरला मतदान होणार आहे.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या 20 संचालक मंडळाची निवडणूक होणार असून, 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडी अशी थेट अस्तित्वाची लढत होत आहे. त्यामुळे केवळ जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी 441 मतदार पात्र असून ते 19 जणांना मतदान करतील. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील नेतृत्व करीत असलेल्या भाजपा-शिदे गटाने शेतकरी विकास पॅनेल गठीत केले तर एकनाथ खडसे नेतृत्व करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मविआने सहकार पॅनेल गठीत केले आहे. शेतकरी पॅनेलला कपबशी आणि सहकार पॅनेलला विमान हे चिन्ह देण्यात आले आहे. 10 डिसेंबरला मतदान होणार असल्याने जिल्हाभर प्रचाराचा धुरळा उडाला आहे.

अधिक वाचा; Pune : नवले पुलाजवळ ट्रकला अपघात; जीव वाचविण्यासाठी दुचाकीस्वाराची तलावात उडी

मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील आमदार या निवडणुकीत उतरले असून, एकनाथ खडसेंना या निमित्ताने आव्हान दिले गेले आहे.

Related Stories

थकीत वीज बीलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पुर्ववत करा

Tousif Mujawar

गौतम अदानींनंतर अनंत अंबानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Archana Banage

शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

datta jadhav

तालिबानचे समर्थन करणाऱ्या १४ भारतीयांना ठोकल्या बेड्या

Archana Banage

उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनचा अंतिम निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

”खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

Archana Banage