हैदराबाद
निलंबित करण्यात आलेले पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन रद्द करत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांचे पद बहाल केले आहे. अंजनी कुमार हे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू असताना रेवंत रेड्डी यांना भेटले होते. निवडणूक आयोगाने अंजनी कुमार यांच्या कृत्याला आचारसंहितेचे उल्लंघन मानले होते. आयोगाने त्यांना निलंबित करत वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवि गुप्ता यांना डीजीपीचा अतिरिक्त पदभार दिला होता.