ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कारमध्ये पैशांचं घबाड सापडलेल्या झारखंडमधील 3 आमदारांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निलंबित केलं आहे. इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन विक्षल कोंगडी अशी निलंबित आमदारांची नावे आहेत.
पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसच्या तीन आमदारांना त्यांच्या कारमध्ये नोटांच्या बंडलांसह ताब्यात घेण्यात आले होते. ही रक्कम एवढी मोठी होती की, पैसे मोजण्यासाठी मशिन मागविण्यात आली होती. पोलिसांनी या तिन्ही आमदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आमदारांकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम मिळाल्याने काँग्रेसमध्ये वादंग उठले आहे. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत सोनिया गांधी यांनी तात्काळ या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाने झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांसह मोठय़ा प्रमाणात रोकड जप्त केल्याचा तपास हाती घ्यावा, असे ट्वटि त्यांनी केले आहे.
हेही वाचा : हिशेब तर द्यावा लागेल; राऊतांना मलिकांच्या शेजारी रहावं लागणार