सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मूच्या सिधरा भागात एकाच कुटुंबातील 6 सदस्य घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. मृतांमध्ये 4 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या सर्वांचा मृत्यू विषाच्या प्रभावामुळे झाला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून तो पूर्ण झाल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. सर्व मृतदेह जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. 6 जणांचे मृतदेह एकूण दोन घरातून हस्तगत करण्यात आले होते. पोलिसांनी प्रथमदर्शनी सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे.