Tarun Bharat

तेलंगणात भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू

Advertisements

पंख्याला लटकलेल्या स्थितीत मृतदेह

वृत्तसंस्था/ हैदराबाद

तेलंगणातील भाजप नेते गनानेंद्र प्रसाद (45 वर्षे) यांचा मृतदेह हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानात आढळून आला आहे. प्रसाद यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत त्यांच्या खासगी सचिवाला दिसून आला हाता. प्रारंभिक तपासात पोलीस याला आत्महत्या मानत आहेत. परंतु कुठल्याही प्रकारची सुसाइड नोट सापडलेली नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गनानेंद्र प्रसाद हे सरलिंगमपल्ली मतदारसंघाकरता पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. प्रसाद यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार तपास केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

भारतात तिसऱ्या लसीला हिरवा कंदील

datta jadhav

हरियाणातील शेतकऱयाची टिकरी सीमेवर आत्महत्या

Patil_p

पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक

Patil_p

कटिहारमध्ये कन्हैयाच्या ताफ्यावर हल्ला

Patil_p

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस शेतकऱयांसोबत

Patil_p

गुड न्यूज : देशातील 4 राज्ये कोरोनामुक्त!

prashant_c
error: Content is protected !!