तैपेई / वृत्तसंस्था
तैवानच्या क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तैवान संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन विभागाचे उपप्रमुख ओ यांग ली-हिंग शनिवारी सकाळी हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. ली-हिंग हे अनेक क्षेपणास्त्र प्रकल्पांवर काम करत होते. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पांची देखरेख करण्यासाठीच्या पोस्टचा पदभार स्वीकारला होता. तैवानची लष्करी संस्था यावषी आपली क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता दुप्पट करण्यासाठी काम करत आहे. तैवानला सध्या चीनकडून धोका आणि लष्करी धमक्मयांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत ली-हिंग यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने चीन-तैवान यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
तैवानच्या मुद्दय़ावरून चीन आणि अमेरिका हे आमने-सामने आले आहेत. त्याच दरम्यान अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्याने हा वाद आणखी चिघळला. नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा चीनने दिला होता. मात्र, चीनच्या या धमकीला दाद न देता नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला. नॅन्सी पेलोसी यांच्या या दौऱयानंतर चीनचा चांगलाच तिळपापड झाला असून हा वाद आणखी वाढला आहे. याचदरम्यान आता तैवानमधून एक मोठी बातमी समोर आली असून क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाचा मृतदेह हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास युनिटचे उपप्रमुख ओ यांग ली-हिंग यांचा मृतदेह शनिवारी सकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये आढळून आल्यानंतर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तसेच ओ यांग ली-हिंग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्मयाने झाल्याचेही बोलले जात आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांना कार्डियाक स्टेंटही लावण्यात आले होते, असे मृत अधिकाऱयाच्या कुटुंबीयांनी सांगितले.