Tarun Bharat

रशियाच्या तेलसम्राटाचा संशयास्पद मृत्यू

रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा दावा ः पुतीन यांच्यावर केली होती टीका

वृत्तसंस्था / मॉस्को

रशियातील 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक बाजारभांडवल असलेली सर्वात मोठी खासगी कच्च्या तेलाच कंपनी लुकोइलचे अध्यक्ष राविल मॅगानोव्ह यांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. 67 वर्षीय राविल यांनी रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा रशियातील सरकारी प्रसारमाध्यमाने केला आहे.

राविल हे मॉस्कोच्या सेंट्रल क्लीनिकल हॉस्पिटलमध्ये हृदयविकारामुळे वैद्यकीय तपासणीसाठी भरती झाले होते. रुग्णालयाच्या खिडकीतून त्यांनी का आणि कशाप्रको उडी घेतली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेवेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते.

मॅगानोव्ह हे धूम्रपान करण्यासाठी बाहेर पडले होते आणि त्यानंतरच त्यांनी इमारतीवरून उडी घेतल्याचा अनुमान व्यक्त होतोय. परंतु त्यांच्याकडे कुठलीच सुसाइड नोट मिळालेली नाही. मॉस्कोतील या रुग्णालयात अनेक महनीय व्यक्तींवर उपचार होत असतात. सोव्हिएत महासंघाचे अंतिम अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह हे देखील निधनापूर्वी येथेच भरती होते.

युक्रेनवरील हल्ल्याप्रकरणी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करणारे राविल हे एकमेव रशियन उद्योगपती होते. याचमुळे राविल यांचा मृत्यू संशयास्पद मानला जातोय. मार्च महिन्यात लुकोइल यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला दुःखद ठरवत युद्ध संपविण्याचे आवाहन केले होते.

राविल लुकोइल हे ऑइल ऑपरेटमध्ये म्हणून 1990 मध्ये कंपनीत दाखल झाले होते तर 2020 मध्ये ते अध्यक्ष झाले. त्यांच्या परिश्रमामुळेच कंपनी तेलजगतातील दिग्गज कंपन्यांमध्ये सामील झाली होती. क्रेमलिनचे ते निष्ठावंत मानले जात होते, परंतु युक्रेनवरील हल्ल्याची निंदा केल्यावर समीकरणे बदलली होती.

अनेक अब्जाधीशांचा संशयास्पद मृत्यू

युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियात अनेक उद्योगपतींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात गॅस कंपनी सर्गेई प्रोटोसेन्याचे माजी व्यवस्थापक नोवाटेक हे मृत आढळून आले होते. त्याच महिन्यात खासगी बँकेचे माजी उपाध्यक्ष ब्लादिस्लाव एवायेव्ह हे पत्नी-मुलीसोबत मृत आढळून आले होते. मे महिन्यात लुकोइलचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक अलेक्झेंडर सुबोटिन यांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

कोरोनामुळे यंदाचा ‘नोबेल सोहळा’ रद्द

Patil_p

चीनच्या 27 लढाऊ विमानांनी पुन्हा ओलांडली सीमा

Patil_p

‘किडनी’च्या बदल्यात झाली स्वप्नपूर्ती

Patil_p

ममता बॅनर्जी सरकारला आणखी एक झटका

Patil_p

अजरबैजान अन् तुर्कस्तानचे सैन्य आघाडीसाठी प्रयत्न

Amit Kulkarni

पाकिस्तानात जवळजवळ १ हजार लोकांचा मृत्यू; पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Abhijeet Khandekar