तरुण भारत

ते बॉम्ब नव्हे; फटाके

पुणे / प्रतिनिधी :

पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ जनरल आरक्षण खिडकीसमोरील मोकळय़ा जागेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याच्या ठिकाणी तीन जिलेटीन कांडय़ांसारख्या दिसणाऱ्या संशयास्पद वस्तू आढळल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. रेल्वे पोलीस व पुणे पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत संबंधित संशयास्पद वस्तूंची मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने पाहणी करत संबंधित पार्सल बी. जे. मेडिकल मैदानावर नेऊन त्याचा स्फोट घडविला. मात्र, त्यात हा बॉम्ब नसून, फटाके असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisements

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याचे वृत्त सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पसरले. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एस. रघुवंशी यांनी संशयास्पद वस्तू पाहून याबाबतची माहिती सुरुवातीला पुणे लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षास फोनद्वारे तात्काळ दिली. त्यानंतर संबंधित माहिती बॉम्बशोधक व नाशक पथक, लोहमार्ग पुणे व पुणे शहर, अग्नीशामक दल, रुग्णवाहिका तसेच सर्व संबंधितांना देण्यात आली. त्यामुळे तातडीने घटनास्थळी बॉम्बशोधक व नाशक पथक, पुणे शहर पोलीस तसेच लोहमार्ग पुणेचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व पुणे शहराचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयित वस्तूची बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाकडून तपासणी केली असता, त्यात कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यात जिलेटीनच्या कांडया नसल्याचे व त्यांना कोणताही पॉवरसोर्स जोडलेला नसल्याचे प्रथमदर्शनी निर्देशनास आले. तरीही आढळलेल्या संबंधित वस्तूंची अधिक तपासणी करण्याकरिता व त्यास स्फोटक सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आल्याने ते निष्क्रिय करण्याकरिता बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून ते सुरक्षितपणे बी. जे. मेडीकल महाविद्यालयाच्या मैदनावर नेण्यात आले. त्याठिकाणी त्याचा स्फोट घडवला असता ते फटाके असल्याचे स्पष्ट झाले.

Related Stories

मटका किंग विजय पाटील याच्या मटका अड्यावर छापा

Abhijeet Shinde

लसीकरण हे राष्ट्रीय कर्तव्य : डॉ. अविनाश भोंडवे

Rohan_P

सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे : सहकार आयुक्त

Rohan_P

सोलापूर ग्रामीणची वाटचाल हजाराकडे

Abhijeet Shinde

UP Election : …. तर आप देणार २४ तासांत ३०० युनिट मोफत वीज

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : मेगा भरतीची पुन्हा घोषणा; १२,५०० जागा भरणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!