Tarun Bharat

सलग सुट्टय़ांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल !

Advertisements

सज्जनगड-ठोसेघरला पर्यटकांचा बहर; पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा

वार्ताहर/ परळी

हिरव्या गार सह्याद्रीच्या डोंगर रांगा, नागमोडी घाट रस्ते अन ऊन पावसाच्या लपंडाव याची अनुभूती याची देही याची डोळा घेण्यासाठी परळी खोऱयातील काही पर्यटनस्थळी विकेंडला तोबा गर्दी होत असते. मात्र शनिवार, रविवार व सोमवारी स्वातंत्र्यदिन असल्याने सलग तीन दिवस शासकीय सुट्टय़ा असल्याने कास, ठोसेघर, सज्जनगड, केळवली धबधबा, सांडवली धबधबा, उरमोडी धरण परिसरात पर्यटकांनी हाऊसफुल्ल केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 निसर्ग हा भरभरून देत असतो, मात्र दैनंदिन व्यापातून याचा आनंद घेण्यासाठी वेळच नाही मिळत. मात्र सलग सुट्टी मिळाल्याने जिह्यातील सर्वच पर्यटनस्थळी निसर्गप्रेमींनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. परळी खोऱयावर निसर्गाचा वरदहस्त हा कायमच राहिला असल्याने विकेंडला ठोसेघर, केळवली, सांडवली, सज्जनगड, चाळकेवाडी, पवनचक्की पठार तसेच उरमोडी धरण परिसरात नेहमीच गर्दी पाहायला मिळते.

 गेल्या आठवडय़ापासून पावसाची संततधार भागात सुरू असल्याने ओढे, नाले धबधबे ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे फेसळलेले धबधबे नजरेने पारणेच फेडत आहेत. तसेच पावसाचा जोर असल्याने उरमोडी धरण क्षेत्रात पाण्याची आवकही मोठय़ाप्रमाणावर वाढली असून सकाळी 7 च्या आवाहलनुसार धरणात 9.31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. विद्युत गृह 500 क्यूसेक व सांडव्यातून 2433 क्यूसेक असा एकूण 2933 विसर्ग नदीपात्रात सोडन्यात आला आहे. तर सद्याची पाण्याची आवक 3532 क्यूसेक आहे.  

वाहतूक कोंडी अन् पार्किंगसाठी कसरत

सलग 3 दिवस सुट्टी असल्यानं निसर्गाची मुक्त उधळण पाहण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज ठोसेघर, सज्जनगड, केळवली येथे दाखल होत होते. मात्र घाट रस्त्यांची रुंदी व गाडय़ांची संख्या पाहता या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळत होती, लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पार्किंग व्यवस्था तोडकी असल्याने गाडय़ा कोठे लावायच्या हाच प्रश्न पर्यटकांना पडला होता. सज्जनगड वाहनतळ फुल्ल झाल्याने रस्त्याकडेलच अस्ताव्यस्त गाडय़ांची पार्किंग केल्याचे चित्र होते. यामुळे काहींना पायपीट करावी लागली तर काहींनी तेथूनच माघारी जाणे पसंतीचे केले.

Related Stories

कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर

Patil_p

पावसाळ्यात कास पुलावर वाहतुक होणार ठप्प ?

Patil_p

स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा नंबर वनवरच

datta jadhav

सलिम,सलमान खान प्रकरण; विश्वास नांगरे पाटलांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

Abhijeet Shinde

दिवाळी अंकातून तरुण भारत’ने वाचकांची अभिरूची वाढविण्याचे काम केले – प्र-कुलगुरू

Abhijeet Shinde

खंडेराया-म्हाळसा विवाहसोहळा संपन्न :विवाहसोहळा संपन्न

Sumit Tambekar
error: Content is protected !!