Tarun Bharat

राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे सुयश

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथे पडुकोन द्रविड स्पोर्ट्स अकॅडमी सेंटर आयोजित सीआयएससीई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व ऍक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी 3 सुवर्ण 2 रौप्य 2 कांस्य पदकासह घवघवीत यश संपादन केले.

या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व ऍक्वेरियस क्लबची जलतरणपटू सुनिधी हलकारेने 200 व 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 2 सुवर्ण तर 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य पटकाविले. समृद्धी हलकारेने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य तर 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, गीता जैनने 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण तर 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पटकाविले.

वरील सर्व जलतरणपटू केएलई जेएनएमसीच्या जलतरण तलावात सराव करीत असून, त्यांना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्मय मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर व इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. समृद्धी व सुनिधी हलकारे या दोघी ज्ञान प्रबोधन स्कूलमध्ये शिकत
आहेत.

Related Stories

रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी तीन मुले पोलिसांच्या ताब्यात

Tousif Mujawar

कारवार जिल्हय़ातील शिवमंदिरे महाशिवरात्रीसाठी सज्ज

Amit Kulkarni

ऑनलाईन वीजबिल भरताना येताहेत तांत्रिक अडचणी

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांच्या कोरोना तपासणीचा घोळ कायम

Omkar B

कोबीज फेकून शेतकऱयांनी केला निषेध

tarunbharat

निपाणीत कार अपघातात चौघे गंभीर

Patil_p
error: Content is protected !!