क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश संपादन केलेल्या सेंट झेवियर्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे खास गौरव करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सेंट झेवियर्सच्या कराटेपटूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावीत यश संपादन केले. त्यामध्ये स्वारज कोचरे, सानवीका काकतीकर, साई मुंगारी, शितल कडोलकर, जनार्थन ऍन्थोनी, विश्वराज पाटील, प्रथम कांबळे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या सर्व विजेत्यांचा सेंट झेवियर्सचे प्राचार्य फादर सेरील व क्रीडा शिक्षक चेस्टर रोझारिओ, जुलीन डिसोझा यांनी खास गौरव केला. या कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले.