Tarun Bharat

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सुनिधी, समृद्धी, गीता यांचे सुयश

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथे झालेल्या सीआयसीएसई राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब व ऍक्वेरियस क्लबचे सुनिधी हलकारे, समृद्धी हलकारे, गीता जैन यांनी 2 सुवर्ण, 5 रौप्य व 1 कांस्य पदकासह घवघवीत यश संपादन केले.

बेंगळूर येथील बसवनगुडी ऍक्वेटीक जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या राज्य जलतरण स्पर्धेत बेळगावचे जलतरणपटू सुनिधी हलकारेने 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य तर 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकाविले. समृद्धी हलकारेने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकाविले. गीता जैनने 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य तर 200 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक पटकाविले. या सर्व खेळाडूंना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्मय मेंडके, नितेश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

पूर्व भागात चुरशीने मतदान

Patil_p

जिल्हय़ातील आणखी नऊ जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

पशुसंगोपन जिल्हा उपनिर्देशकपदी डॉ. राजीव कुलेर

Amit Kulkarni

प्लास्टिक बंदीची जागृती निष्फळ

Amit Kulkarni

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे गैरप्रकार टाळा

tarunbharat

मराठीतून परिपत्रके देण्याची मागणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!