वार्ताहर /कुद्रेमनी
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्यावतीने विजापूर-सिंदगी येथे नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कुद्रेमनी येथील कुस्तीपटूंनी यश मिळविले असून ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत संकेत शिवाजी पाटील याने 97 किग्रॅ वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला. बेळगाव येथील आर. एल. एस. कॉलेजमधील बी. एससी तृतीय वर्षात शिकत असून हुशार विद्यार्थी म्हणून तो ओळखला जातो. प्राथमिक, माध्यमिक शाळेपासून चंदरगी स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये कुस्तीचा सराव करुन कुस्तीमध्ये यश मिळविण्याची आपली परंपरा राखून ठेवली आहे.
वैष्णव श. काकतकर हा भाऊराव काकतकर महाविद्यालयाचा विद्यार्थी असून बी. ए. द्वितीय वर्गात शिकत आहे. त्याने या स्पर्धेत 42 किग्रॅ वजनी गटात तृतीय क्रमांक मिळविला. यापूर्वीही त्याने अनेक बक्षिसे जिंकून यश मिळविले आहे. शिक्षणसंस्था, मार्गदर्शक प्राध्यापक, ग्रामस्थांचे त्यांना प्रोत्साहन लाभले.