प्रतिनिधी /बेळगाव
तुरमुरी येथील रामलिंग हायस्कूलमधील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या उचगाव विभागीय सार्वजनिक शिक्षण खाते तालुका रेंज बेळगाव आयोजित क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे ः 100 मीटर धावणे भावेश जाधव, 200 मी. भावेश जाधव, राहुल डोंगरे, 800 मी. राहुल डोंगरे, भावेश जाधव, 3000 मी. राणी बांडगे, 1500 मी. राणी बांडगे, बुद्धिबळ स्पर्धेत श्रेयश तुप्पट, खो-खो मुले उपविजेतेपद मिळविले. या खेळाडूंना मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर, क्रीडा शिक्षक एन. एम. बोकडे तसेच ए. आर. पाटील, एन. वाय. पाऊसकर, एम. टी. बेळगावकर, पी. जी. पाटील, एल. आर. कोणेवाडीकर, एस. टी. गुंजीकर यांचे प्रोत्साहन लाभले.