लंडन (ब्रिटन )
इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या 2022-23 हंगामासाठी न्यू कॅसल युनायटेड फुटबॉल क्लबने स्वेन बॉटमनबरोबर नवा करार केला आहे. 22 वर्षीय बोटमनबरोबर न्यूकॅसल फुटबॉल क्लबने पाच वर्षांचा हा करार केला आहे.
स्वेन बॉटमनने फ्रान्समध्ये दोन फुटबॉल हंगामामध्ये आपले वास्तव्य केले होते. हॉलंडच्या बोटमनने 21 वर्षांखालील वयोगटाच्या हॉलंडच्या फुटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. न्यूकॅसल युनायटेड क्लबने बोटमनला करारबद्ध करण्यासाठी मोठी रक्कम मोजली आहे.