निदर्यपणे केला खून, ओरडून नये यासाठी तोंडात कोंबला रूमाल किचनमध्ये काटा काढला
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आह़े सुकांत उर्फ भाई सावंत याने पिवळ्या नायलॉनच्या दोरीने किचनमध्ये जेवण करत असलेल्या स्वप्नाली यांचा गळा करकचून आवळला तर यावेळी ओरडण्याचा आवाज येऊ नये यासाठी पम्या गावणंग याने स्वप्नाली हिच्या तोंडात रूमाल कोंबला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर येत आह़े
स्वप्नाली सावंत हिचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई सावंत, रूपेश उर्फ रूप्या कमलाकर सावंत व प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (ऱा सर्व मिऱयाबंदर रत्नागिरी) यांना अटक केली आह़े स्वप्नाली सावंत यांच्याबाबत 1 सप्टेंबरच्या रात्री नेमके काय घडले याबाबत पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आह़े स्वप्नाली सावंत यांचा अतिशय थंड डोक्याने खून करण्यात आला होता अशी माहिती आता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आह़े
एकटी असल्याने साधला डाव
स्वप्नाली या रत्नागिरी शहरात एका सदनिकेमध्ये वास्तव्य करत असतात़ गणपती सणासाठी त्या मिऱया येथील घरी आल्या होत्य़ा स्वप्नाली या मिऱया येथे येणार याची कल्पना सुकांत सावंत याला यापूर्वीच लागली होत़ी स्वप्नाली यांचा काटा काढण्याची हीच योग्य वेळ असल्याची खूणगाठ भाई सावंत याने बांधल़ी स्वप्नाली या घरामध्ये एकटय़ा असल्याचा फायदा उठवून काटा काढायचा असा प्लान सुकांत सावंत याच्या डोक्यात शिजत होत़ा त्यानुसार भाई सावंत याने रूपेश सावंत व पम्या या दोघांनाही सोबत घेऊन कटाची माहिती दिल़ी
1 सप्टेंबर रोजी सायंकाळी स्वप्नाली सावंत या घराच्या किचनमध्ये जेवण करत होत्य़ा यावेळी बाहेरच्या रूममध्ये असलेल्या भाई सावंत याने रूप्या व पम्या याला इशारा करत झडप घालण्याची हिच योग्य वेळ असल्याचे खुणावल़े जेवण करत असलेल्या स्वप्नाली हिचे लक्ष नसल्याचे पाहून पती सुकांत सावंत याने पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी स्वप्नाली सावंत हिच्या गळ्याभोवती आवळल़ी तर स्वप्नाली या ओरडून आवाज करू नये यासाठी पम्या याने त्यांच्या तोंडात रूमाल कोंबला व रूपेश याने स्वप्नाली या प्रतिकार करू नये यासाठी पाय धरून ठेवल़े
घराच्या मागे पेटवून दिले
तिघांनी लावलेल्या ताकदीपुढे स्वप्नाली सावंत या फार प्रतिकार करू शकल्या नाहीत़ स्वप्नाली यांचा गळा आवळल्यामुळे अवघ्या काही मिनिटातच मृत्यू झाल़ा मृत अवस्थेत पडलेल्या स्वप्नाली यांचा मृतदेह किचनमधून घराच्या मागच्या बाजूला नेण्यात आल़ा याचठिकाणी स्वप्नाली सावंत यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आल़े संशयित आरोपी सुकांत सावंत याने कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी स्वप्नाली सावंत हिची राख समुद्रात टाकून दिल़ी अशी माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आह़े
सुकांत सावंत याने पोलिसांचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी स्वतःहून रत्नागिरी शहर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल़ी दरम्यान मृत स्वप्नाली सावंत यांची राख पोलिसांच्या हाती लागल्याने यासंबंधी तपास करणे पोलिसांपुढे आव्हानात्मक ठरत आहेत़ संशयित तिनही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े यादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे गुह्याचा तपास करत आहेत़