रत्नागिरीतील गोखले नाका येथे झाली होती मारहाण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत हिच्या खून प्रकरणात पूर्वी झालेले वाद असल्याचे समोर आले आहेत. 2020 मध्ये शहरातील गोखले नाका येथील सलोनी ब्युटी पार्लर येथे सुकांत सावंत व त्याची मुलगी पूजा यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार स्वप्नाली हिने शहर पोलिसांत दाखल केली होत़ी यामुळे काही महिने सुकांत याला तुरूंगामध्ये काढावे लागले होत़े याच रागातून स्वप्नाली हिचा काटा काढल्याचे तपासामध्ये समोर येत आह़े
1 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या किचनमध्ये गळा आवळून खून केल़ा तसेच यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल़ा तसेच त्याची राख व हाडे समुद्रात फेकून दिल्याचे समोर आल़े या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (47), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (ऱा सर्व सडामिऱया रत्नागिरी) यांना अटक केल़ी तीनही संशयितांना 19 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े
स्वप्नाली सावंत व पती सुकांत सावंत यांच्यामध्ये मागील काही वर्षापासून सातत्याने वाद होत होत़े यातून सुकांत सावंत हा स्वप्नाली हिला मारहाण करत होत़ा या संबंधी वारंवार स्वप्नाली हिने पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील गोखले नाका येथील सलोनी ब्युटी पार्लर येथे सुकांत सावंत व स्वप्नाली यांच्यात जोरदार भांडण झाले होत़े यावेळी सुकांत सावंत व त्याची पहिल्या पत्नीपासून असलेली मुलगी पूजा सुकांत सावंत हिने आपल्याला मारहाण केल़ी तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार स्वप्नाली हिने शहर पोलिसांत दाखल केली होत़ी
शहर पोलिसांनी सुकांत सावंत व त्याची मुलगी पूजा सावंत यांच्याविरूद्ध भादंवि कलम 307, 392, 452 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला होत़ा तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले आह़े खटल्यातील दोन्ही संशयितांना न्यायालयाने जामिनावर सोडले होत़े सध्या या प्रकरणाचा खटला सत्र न्यायाधीश महम्मद कासीम शेख मुसा शेख यांच्या न्यायालयात चालवण्यात येत आह़े खटल्याची पुढील सुनावणी ही 12 ऑक्टोबर 2022 रोजी ठेवण्यात आली आह़े
या गुह्याप्रकरणी स्वप्नाली सावंत ही तडजोड करण्यास तयार नव्हत़ी त्यामुळे या खटल्यात आपल्याला शिक्षा होईल, अशी भीती सुकांत सावंत याच्या मनामध्ये निर्माण झाली होत़ी तसेच सातत्याने सुकांत सावंत याला तारखेला कोर्टाच्या चकरा माराव्या लागत होत्य़ा त्यामुळे स्वप्नाली हिच्याविरूद्ध सुकांत याच्या मनामध्ये राग खदखदत होत़ा यातूनच स्वप्नाली हिला कायमचे संपवावे, असा कट सुकांत सावंत याने केला होता, अशी माहिती समोर येत आह़े
दोन गाडय़ा पोलिसांनी केल्या जप्त
स्वप्नाली सावंत खून प्रकरणात पोलिसांनी सुकांत सावंत व संशयितांनी गुह्यामध्ये वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत़ यामध्ये एका कारचा समावेश असून एक दुचाकी आह़े या वाहनांमधून काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत.