Bharat Jodo Yatra : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar ) आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सामील झाली. उज्जैनमध्ये ( Ujjain) ती राहुल गांधींसोबत ( Rahul Gandhi ) चालली अभिनेत्री स्वरा भास्कर बुधवारीच इंदूरला पोहोचली होती, आज सकाळी ती यात्रेत चालली. या अगोदर पूजा भट्ट, सुशांत सिंग, रश्मी देसाई, रिया सेन आणि जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी देखिल भारत छोडो यात्रेत उपस्थिती लावली होती.
आपल्या सडेतोड विधानाने नेहमी चर्चेत असणाऱ्या स्वरा भास्कर सरकारविरोधी टिप्पणीसाठीही ओळखली जाते. यात्रेच्या सुरवातीलाच स्वरा भास्करने पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज ती उजैनमध्ये सामिल झाली. या अगोदरच ऑक्टोवर महिन्यात तीने ट्विटरवर “कॉंग्रेसचा निवडणुकितील सततचा पराभव, सोशल मिडीयातून होणारे ट्रोलींग, माध्यमातून त्यांच्यावर होणार व्यैयक्तीक हल्ले तरीसुद्धा राहूल गांधींचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहे. राहूल गांधी कधीच जातीय टिकेला बळी पडले नाहीत. सध्याची भारताची परिस्थिती पाहता भारत जोडो सारखा प्रयत्न प्रशंसनीय आहे.” असे ट्विट केले होते.

