Tarun Bharat

देसूरमध्ये स्वराज ग्रुपच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

वार्ताहर /धामणे

देसूर येथे रविवार दि. 27 रोजी स्वराज ग्रुप आयोजित मॅरेथॉन स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडल्या असून युवकांच्या गटात बबन शिंदे (नेसरी) या युवकाने 10 किमी अंतर 24 मिनिटात पळून प्रथम क्रमांक मिळविला. तर युवतींच्या गटात प्राजक्ता शिंदे या युवतीने 5 किमी अंतर 14 मिनिट 30 सेकंदात धावून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

स्वराज ग्रुपने रविवार दि. 27 रोजी युवक व युवती अशा दोन गटात आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले. युवकांच्या ग्रुपमध्ये बबन शिंदे प्रथम, रोहित खानापूर द्वितीय क्रमांक व तिसरा क्रमांक लक्ष्मण पाटील (गर्लगुंजी) याने मिळविला. युवकांच्या गटातील एकूण 11 नंबरपर्यंत विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली तर युवतींच्या गटातील प्रथम क्रमांक प्राजक्ता शिंदे (बेळगाव) हिने मिळविला. द्वितीय क्रमांक शुभांगी काकतकर (बेळगाव), तृतीय क्रमांक शोभा मंगणाकर (बेळगाव) हिने पटकाविला. युवतींच्या गटातील विजेत्या 11 नंबरना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत दोन्ही गटातही स्पर्धकांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता. याप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी ऍड. हर्षवर्धन पाटील आणि स्वराज ग्रुपचे सेक्रेटरी वेंकटेश पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिस बहाल करण्यात आले. याप्रसंगी स्वराज ग्रुपचे अध्यक्ष नामदेव नावगेकर, शाम गावकर, अरविंद पाटील, दिपक पाटील, स्वराज ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

वादळी पावसामुळे शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान

Amit Kulkarni

सामनावीर रोनित मोरेच्या अचुक गोलंदाजीमुळे रेल्वेचा खुर्दा

Patil_p

एकच मराठी उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करावेत

Amit Kulkarni

विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना विश्वकर्मा सेवा संघाचे निवेदन

Amit Kulkarni

ऑटोरिक्षा, कॅब चालकांना मदतीसाठी अर्जाचे आवाहन

Amit Kulkarni

वडगाव येथील बालकाचा डेंग्यूने घेतला बळी

Tousif Mujawar