Tarun Bharat

स्वराज्यभूमी कोकण महोत्सव २०२२ मुंबई पुरस्कृत “कोकण आयडॉल पुरस्कार”वनश्री फाऊंडेशन सिंधुदुर्गला प्रदान

Swarajyabhoomi Konkan Mahotsav 2022 Mumbai Awarded “Kokan Idol Award” to Vanashree Foundation Sindhudurg

कोकण भूमी प्रतिष्ठान व मी मुंबई अभियान यांच्या सहकार्याने चार दिवस कोकण महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये कला, क्रीडा, ग्रामीण जीवन यावर प्रबोधन करणारे तीनशे कलाकारांचा समावेश होता. महत्वपूर्ण अशा काजू, आंबा उद्योग परिषद, कोकण मत्स्य तसेच वन परिषद, कोकण सागरी परिषद, कोकण पर्यटन व आदिवासी परिषदांचा समावेश होता.

कोकण मत्स्य व वनपरिषदेच्या माध्यमातून तसेच कोकणातील सह्याद्री व निसर्गाचे संवर्धन आणि शाश्वत विकास व रोजगार निर्मिती व कांदळवन विकास याविषयी प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन वीरेंद्र तिवारी यांंनी माहिती दिली. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प डॉ. व्हि. क्लेमेंट बेन यांनी जैवविविधता संवर्धन, शाश्वत निसर्ग पर्यटन विकासावर प्रकाशझोत टाकत महाराष्ट्रातील राखीव संवर्धन व जैवविविधतेवर विस्तृत मार्गदर्शन केले. मत्स्य व्यवसाय सह आयुक्त श्री देवरे यांनी मच्छी संवर्धन व व्यवसायावर मार्गदर्शन केले. कोकणातील जैवविविधता संवर्धन व संरक्षण,निसर्ग संवर्धन करणाऱ्या “वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग” च्या जैवविविधता संवर्धन व संशोधनच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला व “स्वराज्य भूमी कोकण” महोत्सवाचा महत्त्वपूर्ण “कोकण आयडॉल पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

दोडामार्ग – वार्ताहर

Related Stories

रत्नागिरी : खेडच्या पाणीटंचाईप्रश्नी आमदार योगेश कदम आक्रमक

Archana Banage

धामापूर, आंबेरीत वाळू रॅम्प तोडले

NIKHIL_N

कोरोनाची माहिती ग्राम कृती दलांना द्यावी

Patil_p

कोरोनातही यंदा गणेशोत्सवाचा थाट राहणार आगळा!

Patil_p

रत्नागिरीत ‘श्रावणसरी’ जोरदार

Patil_p

कुंभारमाठ ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला रास्तारोकोचा इशारा

Anuja Kudatarkar