ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) झाले. नवीन सरकार सत्तेत येऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नव्हता. मात्र तब्ब्ल ३८ दिवसानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. एकूण १८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी ६ नवे निश्चित मानली जात आहे.
शिंदे गटाकडून आमदार उदय सामंत, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दादा भुसे, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड यांची नवे मंत्रिपदासाठी निश्चित झाली आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुरेश खडे, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान, मागील ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. या मंत्रिमडळासाठी शिंदे गट आणि भाजपाकडून एकूण १८ आमदार शपथ घेतील असे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यात सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात होती. परंतु, आज अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे कोणत्या आमदारांना शपथ दिली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Swearing at the Raj Bhavan Durbar Hall Maharashtra Cabinet Extension )
आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. नव्या शिंदे गट आणि भाजप यांच्या सराकारच्या मंत्रिमंडळात भाजपाकडून नवे चेहरे दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अनुभवी नेत्यांनाच पुन्हा संधी देत भाजपाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तर शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडून मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक सुरु आहे. बैठकीनंतरीच हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
हे ही वाचा : बाबू कालियाची एक्झीट ; मनोरंजन विश्वावर शोककळा