Tarun Bharat

तळपायाला घाम येतोय? वेळीच काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर आजार

Advertisements

काही लोक त्यामागील कारण शोधून उपचार घेतात, तर काही लोक दुर्लक्ष करत राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही हा त्रास दुर्लक्षित केल्याने भविष्यात मोठ्या आरोग्य समस्येला सामोरे जावे लागू शकते. यामागे अनेक कारणे आहेत.

वातावरणातील उष्णता जस जशी वाढते त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. वातावरणातील बदलांमुळे अनेकदा घशाला कोरड पडणे, सतत घाम येणे या समस्या अनेकांना त्रासदायक ठरत असतात. यात अनेक जणांच्या पायांना देखील घाम येतो. त्यामुळे या समस्येने अनेक जण बेजार होत असतात. अनेक वैद्यकीय उपचार केल्यानंतरही या त्रासापासून सुटका होत नाही. काही लोक त्यामागील कारण शोधून उपचार घेतात, तर काही लोक दुर्लक्ष करत राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही हा त्रास दुर्लक्षित केल्याने भविष्यात मोठ्या आरोग्य समस्येला सामोरे जावे लागू शकते. यामागे अनेक कारणे आहेत.

बऱ्याचदा जर तळपायाला घाम येत असेल तर त्यामागे अनुवंशिकता हे एक कारण असू शकते. काही लोकांमध्ये मुळातच घाम यायचे प्रमाण खूप जास्त असते. कधीतरी हवेतील उष्णतेमुळे, ताप, काही इन्फेक्शन, गरम व ऊबदार कपडे यामुळे सुद्धा तळपायाला घाम येतो.

तुम्ही जर नर्व्हस असाल, कसली भीती किंवा दडपण असेल तरीही तळपायाला घाम येतो. तळपायांना घाम येण्याचं आणखी एक कारण म्हणजे मोज्यांची चुकीची निवड. खूप जाड कापडाचे मोजे घालत असाल तर पायांना हवा मिळत नसल्याने सुद्धा घाम येतो.

आपल्या शरीरात ‘व्हेगल’ नावाची एक नस असते, जिचे काम शरीरात घाम निर्माण करणे आणि ही नस शरीरात मेंदूपासून पायाला जोडलेली असते. याचा थेट संबंध पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्थेशी आहे, जे शरीराचे तापमान नियंत्रित करते. दुसरीकडे, जर एखाद्याला खूपच घाम येत असेल, तर ते opposite sympathetic nervous सिस्टममुळे घडते.

याशिवाय तळपायांना जास्त घाम येणे हे मानसिक ताण, दारूचे सेवन आणि शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता यामुळे देखील होत असते. अशा स्थितीत तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारावी लागेल, अन्यथा तळपायांना घाम येण्याच्या समस्येमुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका देखील असतो.

तळपायांना येणारा घाम कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज २०० मिलीग्राम सप्लिमेंट्सच्या स्वरूपात मॅग्नेशिअम घ्यावे लागेल. यामुळे तुमचा त्रास कमी होऊ शकतो. याशिवाय पायांची काळजी घ्यावी लागते, कारण अनेक वेळा पायांमध्ये बॅक्टेरियामुळेही अशा प्रकारची समस्या उद्भवते.

Related Stories

देशात 44,878 नवे कोरोना रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 87 लाखांवर

datta jadhav

सत्ता गेल्याने अनेकांचा जीव कासावीस : उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

शरद पवारांनी पक्ष फोडला, शिवसैनिकांच्या वेदना सांगताना रामदास कदमांना अश्रू अनावर

Rahul Gadkar

धोका ‘ब्लॅक फंगस’चा

Omkar B

काबूलमध्ये पुन्हा स्फोट

Abhijeet Shinde

पंढरपुरात 21 आरोग्य कर्मचारी,17 कैद्यांना कोरोनाची बाधा

Sumit Tambekar
error: Content is protected !!