Tarun Bharat

स्वीडनचा भारतावर निसटता विजय

अँजेलहोम (स्वीडन) : 23 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू झालेल्या तीन देशांच्या महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत बुधवारी भारतीय महिला फुटबॉल संघाला सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. दुखापतीच्या कालावधीत स्वीडनने भारताचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात स्वीडनचा एकमेव गोल स्वीडनच्या लिन विक्युसने दुखापतीच्या कालावधीत नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले.

या सामन्यात सुरूवातीला स्वीडनच्या खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय गोलपोस्टपर्यंत वारंवार मुसंडी मारली पण भारताच्या गोलरक्षकाने स्वीडनचे हल्ले थोपविले. 12 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी भारताने गमविली. 35 व्या मिनिटाला भारतीय संघातील मनिषाने स्वीडनच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण तिला गोल नेंदविता आला नाही.

Advertisements

Related Stories

स्वीडनचा इब्राहिमोव्हिक युरो स्पर्धेतून बाहेर

Patil_p

दियागो मारडोनाला रूग्णालयातून लवकरच डिस्चार्ज

Omkar B

भारत-लंका मालिकेतील सर्व सामने कोलंबोत

Patil_p

प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण, युपी योद्धा संघांचे शानदार विजय

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलिया-लंका टी-20 मालिका आजपासून

Amit Kulkarni

दिविज शरण-सिटॅक उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!