Tarun Bharat

स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय नोबेल

Advertisements

स्टॉकहोम : स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. लुप्त झालेल्या होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीमधील जीनोम संबंधित अभ्यासाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच त्यांनी होमिनिन डेनिसोवा यासंबंधीही संशोधन केले आहे.

स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठय़ा प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत. कोविड महामारीने वैद्यकीय संशोधनाला केंद्रस्थानी ठेवले असताना हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल. त्यानंतर शुक्रवारी नोबेल शांतता पुरस्कार आणि सोमवार, 10 ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील पुरस्कार जाहीर केला जाईल.

Related Stories

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन, पाकिस्तान विरोधात निदर्शने

datta jadhav

अमेरिका : सिनसिनाटी शहरात गोळीबार; 8 ठार

datta jadhav

दहशतवादी कमांडर निसारचा खात्मा

Patil_p

जगभरातील कोरोनामुक्ती 15 कोटींपार

datta jadhav

कजाकस्तानात महागाईमुळे जनता संतप्त

Patil_p

अफगाणिस्तानातून आतापर्यंत 800 हून अधिकांची सुटका

Patil_p
error: Content is protected !!