प्रतिनिधी / बेळगाव
सुट्टीनिमित्त आलेला बेळगुंदीचा जवान कडोली येथे मामाच्या गावी जाऊन परत बेळगुंदी कडे येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक बसून ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री बाकनूर क्रॉसनजीक घडली. ओंकार महादेव हिंडलेकर (वय 24) राहणार कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे त्या मृत जवानाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील,भाऊ बहीण, वहिनी असा परिवार आहे. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे.