चार सुवर्ण, 13 रौप्य, 18 कास्यपदकासह 35 पदकांची लयलूट
क्रीडाप्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या 19 वर्षाखालील जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स क्लब व अॅक्वेरियर्स क्लबच्या जलतरणपटूंनी चार सुवर्ण, 13 रौप्य, 18 कास्य पदकांसह घवघवीत यश संपादन केले आहे. त्यातील जलतरणपटू एसजीएफआय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.
बेंगळूर अॅक्वेटिक सेंटर येथे घेण्यात आलेल्या या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व अॅक्वेरियस क्लबचे जलतरणपटू इमानी जाधवने 3 सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य, रिया हेरेकरने 1 सुवर्ण, दोन कास्य, अजिंक्य सुणगारने 2 रौप्य, तीन कास्य, आदित्य बिर्जेने 2 रौप्य,2 कास्य, समर्थ मोरेने 2 रौप्य, 2 कास्य, शिवानी चौगुलेने 2 रौप्य, एक कास्य, तनिष्का मोरेने 1 रौप्य, चार कास्य, खुशी बाळेकुंद्रीने एक रौप्य, 2 कास्य, क्रीजाना इराणीने 1 रौप्य, एक कास्य, परिका हेरेकरने 1 रौप्यपदक पटकावले.
इमानी जाधव, रिया हेरेकर, क्रीजाना इराणी, परिका हेरेकर व शिवानी चौगुले यांची एसजीएफआय राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक जलतरण संघात निवड झाली आहे. या सर्वांना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेकर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे