वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या पुरूषांच्या माँटे कार्लो मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन करणाऱया स्वीसच्या वावरिंकाचे एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत बुबलीकने संपुष्टात आणले.
सोमवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात कझाकस्तानच्या बुबलीकने वावरिंकाचा 3-6, 7-5, 6-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये वावरिंकाच्या पायाला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तीन महिन्यापूर्वी त्याच्या या दुखापतीवर दुसऱयांदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 37 वर्षीय वावरिंकाने तीनवेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.
पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात इटलीच्या फॉगनेनीने फ्रान्सच्या रिनडेरकेनिचचा 7-5, 4-6, 6-3, अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्डाने झेंडस्कूपचा 7-5, 6-4, स्पेनच्या व्हिनोलासने ग्रीकस्पूरचा 6-4, 4-6, 6-2 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.