Tarun Bharat

स्वायटेक, रिबेकिना, साबालेंका, सॅकेरी उपांत्य फेरीत

सिनेर /वृत्तसंस्था

इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया) येथे सुरू असलेल्या बीएनपी पेरीबस इंडियन वेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडची इगा स्वायटेक, रिबेकिना, साबालेंका आणि सॅकेरी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. पुरुष एकेरीत रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव, स्पेनचा कार्लोस अलकॅरेझ, इटलीचा सिनेर आणि अमेरिकेचा टायफो यांनी शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले.

महिला एकेरीच्या गुरुवारी येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडची टॉप सिडेड स्वायटेकने सोरेना सिरेस्टीचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. स्वायटेक आणि रिबेकिना यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. साबालेंकाने झेकच्या मुचोव्हाचा 7-6(7-4), 2-6, 6-4 असा फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेती साबालेंकाने या स्पर्धेत यापूर्वीच्या सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान 6-4, 6-0 असे संपुष्टात आणले होते. पुरुष एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या डॅनिल मेदव्हेदेवने फोकिनाचा 6-3, 7-5 असा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या टायफोने ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीचा 6-4, 6-4 असा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. स्पेनच्या टॉप सिडेड कार्लोस अलकॅरेझने कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर अॅलिसिमेचा 6-4, 6-4 तसेच इटलीच्या जेनिक्स सिनेरने या स्पर्धेतील विद्यमान विजेता अमेरिकेचा टेलर फ्रिट्झचा 6-4, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

Related Stories

लियांडर पेसच्या वेबसाईटचे उद्घाटन नवी दिल्लीत

Patil_p

श्रेयस अय्यरवर लागली सर्वाधिक बोली, 12.25 कोटींना…

datta jadhav

सेतु एफसीच्या विजयात संध्याची चमक

Patil_p

न्यूझीलंडच्या टी-20 वर्ल्डकप जर्सीचे अनावरण

Amit Kulkarni

मुंबई इंडियन्सचे किरण मोरे कोरोनाबाधित

Patil_p

ईपीएल स्पर्धेत मँचेस्टर सिटीचे साम्राज्य कायम

Patil_p