थेट ओटीटीवर होणार प्रदर्शित
तापसी पन्नूचा चित्रपट ‘ब्लर’ थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीने बुधवारी मोशन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारी जाहीर केली आहे. ब्लर हा तापसीच्या प्रॉडक्शन कंपनीचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर स्वरुपाचा असून याचे दिग्दर्शन अजय बहलने केले आहे.
तापसी पन्नूसोबत या चित्रपटात गुलशन देवैया मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ब्लर हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. ‘आंखो को जो दिखत है, उससे कहीं ज्यादा होता है’ असे पोस्टरच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. तापसी यात स्वतःच्या जुळय़ा बहिणीच्या मृत्यूचे कारण शोधणाऱया युवतीची भूमिका साकारत आहे.
स्वतःची दृष्टीक्षमता गमाविणाऱया युवतीची भूमिका साकारण्यासाठी तापसनी 12 तासांपर्यंत डोळय़ांवर पट्टी बांधून घेतली होती. या चित्रपटाचे चित्रिकरण नैनीतालमध्ये पार पडले आहे. तापसीने या चित्रपटाची घोषणा मागील वर्षी जुलै महिन्यात केली होती. तापसी आता दमदार पटकथा असलेल्या चित्रपटांची निवड करत आहे.