Tarun Bharat

तैवानला चीननं चारही बाजूंनी घेरलं; हवाई, जलमार्गावर नाकाबंदी

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून वांदग निर्माण झाले आहे. या भेटीमुळे भडकलेल्या चीनने तैवानला हवाई आणि जलमार्गावर चारही बाजूंनी घेरलं आहे. त्यामुळे जगाचं लक्ष तैवानकडे लागले आहे.

तैवानला आपला प्रदेश मानणाऱ्या चीनने अमेरिकेला वारंवार चेतावणी देऊनही पेलोसी मंगळवारी उशिरा तैवानमध्ये दाखल झाल्या. तैवान भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन आणि इतर खासदारांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी पेलोसींनी तैवानच्या संसदेला संबोधित केलं. होतं. त्यामुळे भडकलेल्या चीनने जाणीवपूर्वक तैवानला घेरलं आहे.

नॅन्सी पेलोसी यांचं विमान थोडय़ाच वेळात तैवानमधून दक्षिण कोरियासाठी उड्डाण घेणार आहे. तैवानच्या चारही बाजूने समुद्र आहे. जलमार्ग आणि हवाईमार्गावरही चीनची नाकाबंदी असल्याने जगाचं टेन्शन वाढलं आहे. तैवानच्या चारही बाजूनी नो एन्ट्री झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पेलोसी यांचं विमान दक्षिण कोरियापर्यंत पोहचेपर्यंत जगाचं लक्ष तैवानकडे असणार आहे.

अमेरिकेने चिनी धमक्यांना हलकेपणाने घेतले नव्हते. तैवानला येताना नॅन्सी पेलोसी यांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था त्यांनी केली होती. नॅन्सी पेलोसी यांच्या विमानाला अमेरिकी नौदल आणि हवाई दलाच्या 24 प्रगत लढाऊ विमानांनी एस्कॉर्ट केले होते, त्यामुळे चीनच्या बाजूने काही कारवाई झाली तर त्याला चोख प्रत्युत्तर देता येईल, अशी तयारी होती. दरम्यान, चीन अमेरिकेला केवळ आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही प्रकारचं युद्ध चीन करणार नाही, असे आंतरराष्ट्रीय जाणकारांकडून सांगण्यात येते.

हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी

Related Stories

कर्नाटक पोटनिवडणूक : उमेदवारी देण्यावरून भाजप, काँग्रेस संभ्रमात

Abhijeet Shinde

तोरण आणि धोरण उद्या ठरणार, संभाजीराजेंची उद्या मुंबईत पत्रकार परिषद

Rahul Gadkar

संजय राऊत, खडसे यांचे समाजकंटक असल्याच्या बहाण्याने फोन टॅप : पोलीस

Abhijeet Shinde

आपले पूर्वज माकडे नाहीत तर मासे

Patil_p

परदेशी पर्यटकांना कोरोना झाल्यास उज्बेकिस्तान देणार सव्वा दोन लाख रुपये

datta jadhav

मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही : शरद पवार

Rohan_P
error: Content is protected !!