Tarun Bharat

पर्यटकांना सतावणाऱयांविरुद्ध कारवाई करा

हरमल ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी

वार्ताहर /हरमल

किनारी भागांत परप्रांतीय व्यावसायिकांच्या हरकती किनाऱयावर चालणाऱया पर्यटक व नागरिकांना सतावणाऱया असून शॅक्स व सन बेडस, टेबल्सच्या अतिक्रमणामुळे चालणे मुश्कलि झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हरमलच्या ग्रामसभेत नागरिकांनी केली आहे.

सदर ग्रामसभा सरपंच भिकाजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. प्रारंभी पंचायत सचिव फ्रान्सिस फेर्ना?डिस यांनी मागील सभेचा इतिवृतांत वाचून दाखवला. किनाऱयावर नागरिक व पर्यटकांना चालत जाणे कठीण बनले आहे. शॅक्स ते समुद्राचे पाणी ह्यामधल्या खुल्या जागेत तर काहीजण पाण्याजवळ सन बेडस, टेबल्स, खुर्च्या अस्ताव्यस्त मांडून ठेवत असतात. सरळसरळ कायद्याचे उल्लंघन होत असल्याने महिला ग्रामस्थाने लक्ष वेधून घेतले. सदर गंभीर प्रश्नांची दखल घेऊन उद्या पाहणी व  कारवाई करण्यात येईल, असे सरपंच नाईक व सचिव फेर्ना?डिस यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याने पंचायती कडून दाखला न मिळाल्याने एक दिवस मृतदेह ठेवावा लागला. त्यामुळे पंचायत सरपंच नाईक यांनी कारकून सुट्टीवर असल्याने दाखला दिला नाही, असे सांगितले. रविवारी कार्यालय उघडण्याचा प्रयत्न केल्यास आरटीआयचा अर्ज सुद्धा दाखल करून घेण्याचा आग्रह एका नागरिकाने लावला अन्यथा तुमच्यावर आरटीआय तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याने कारकून भयभीत झाला व मयत झाल्याचा दाखला सुट्टी असल्याने दिला नाही.ग्रामस्थ टोनी डिमेलो यांनी सदर कर्मचाऱयाला मेमो देण्याचा आग्रह धरला व मात्र माजी सरपंच इनसियो डिसौझा यांनी पुन्हा असे प्रकार होऊ नये असे सांगून प्रश्न आटोपता घेतला.

गेल्या मार्च मध्ये झालेल्या ग्रामसभेतील दोन प्रश्नांवरील चर्चा व ठराव इतिवृतांत नसल्याने टोनी डिमेलो व विनायक मेथर यांनी जाब विचारला व सभा रोखून धरली. ग्रामस्था?च्या रेटय़ामुळे दोन्ही विषय ह्या ग्रामसभेत दाखल करून घेतले व जबाब देण्यात आला. लोकवस्तीत असलेल्या रेस्टॉरंट,बार व्यावसायिकांना रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण व गोंगाट न करण्याची ताकीद द्यावी असे संजय नाईक यानी सुचवले.गांवातील देऊळे, मंदिरे,चर्च,कपेल्स आदींची नोंदणी असून, नवीन भक्तीस्थान परशुराम टेकडीचे नोंदणीकरण करावे अशी सूचना माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केली.

मधलावाडा भागातील बहूचर्चित हॉटेल प्रकल्पाचे  काम पूर्ण होण्याआधी ओक्मयुपनसी दाखला मागील पंचायत मंडळाने ग्रामसभेला विश्वासात न घेता दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सदर दाखला मागे घेण्याची मागणी ग्रामस्था?नी केली व सर्वसंमतीने मान्य करण्यात आली.  गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळास देण्याचा ठराव महेश वायगंणकर यानी मांडला व सर्वानुमते संमत केला.

ह्यावेळी झालेल्या चर्चेत संजय नाईक,रुपेश नाईक,चंद्रहास दाभोलकर, मारसेलिन फेर्ना?डिस,बाबो माज्जी, विनायक मेथर, स्वरूप नाईक,लावरीयन फेर्ना?डिस, संतोष कोरकणकर,भाऊ गडेकर आदींनी भाग घेतला.

 ाावेळी रस्ता सुरक्षा व दक्षता समिती,ग्राम विकास समिती,फूड अँड सॅनिटरी समिती, कचरा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.ह्या समितीला अधिकार नसल्याने ग्रामस्था?नी अनुत्साह दाखवला व नाराजी व्यक्त केली.

ह्यावेळी उपसरपंच दिव्या गडेकर, पंच अनुपमा मयेकर, सोनाली माज्जी,सांतान फेर्ना?डिस,सुशांत गावडे,गुणाजी ठाकूर,रजनी इब्राह्मपुरकर व गटविकास खात्याचे संतोष नाईक उपस्थित होते.शेवटी सरपंच भिकाजी नाईक यांनी आभार मानले.

Related Stories

अमृत महोत्सवी वर्षात गोव्यात 75 उद्योग

Amit Kulkarni

भरत जगताप यांना आचार्य अत्रे पुरस्कार

Amit Kulkarni

डॉमनिक गावकर यांचा ’आप’मध्ये प्रवेश

Amit Kulkarni

डॉ. सुरेश आमोणकरांच्या पार्थिवावर आमोणेत अंत्यसंस्कार

Patil_p

धारगळ येथे टेलर ट्रकला आग केबिन जळून खाक

Amit Kulkarni

वेर्णात धावत्या कारवर वृक्ष कोसळून वेर्णातील कंपनीचे अधिकारी ठार

Omkar B