रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे टिकैत यांच्यावर विकृत गुंडांनी शाईफेक केली. त्याचा निषेध करत त्या गुंडांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
राकेश टिकैत हे शेतकऱयांचे नेते आहेत. त्यांनी शेतकऱयांसाठी आंदोलन केले आहे. मात्र काही गुंडांनी जाणूनबुजून त्यांच्यावर शाईफेक केली आहे. बेंगळूर येथील गांधी भवन येथे हा प्रकार घडला आहे. यामधील जे आरोपी आहेत. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. आरोपींवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील शेतकऱयांनी दिला आहे. यावेळी चन्नाप्पा पुजेरी, सिद्धगौडा मोदगी, आप्पासाहेब देसाई, सुरेश मऱयाकाचे, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक, शिवानंद मुगळीहाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.