Tarun Bharat

मायग्रेन झाल्यास अशी घ्या काळजी…

नॉर्मल डोकेदुखी असली की आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मधील टॅबलेट घेऊन तात्पुरती डोके दुखी थांबवायचा प्रयत्न प्रयत्न करतो. पण मायग्रेनमध्ये असह्य डोकेदुखी होते. मायग्रेनमुळे डोक्याचा अर्धा भाग दुखतो तर, कधीकधी पूर्ण डोकंही दुखायला लागतं. डोकं जास्त प्रमाणात दुखत असेल तर, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा नेमकं कशामुळे डोकं दुखायला लागतं हे ओळखायला शिकलं पाहिजे. तीव्र वास, डिहायड्रेशन, एल्कोहोल यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. वातावरणातील बदलामुळेही मायग्रेन होतो.

अशी घ्या काळजी

पुरुषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो. काही महिलांना मासिक पाळी च्या काळात मायग्रेनचा त्रास होतो.

कामाच्या व्यापात जेवनाकडे दुर्लक्ष होत. जास्त वेळ उपाशी राहण्यानेही मायग्रेन होतो. तज्ज्ञांच्या मते हेल्दी डाएटसाठी वेळ द्यायला हवा. ऑफिस मध्ये जेवायला वेळ देता येत नसेल तर, जवळ काही फळं किंवा ड्रायफ्रुट ठेवावेत.

मायग्रेनचा त्रास होत असेल तर, घरी ताबडतोब कळवा. वेदना होत असताना शरीराला आराम मिळाला तर, वेदना कमी होऊ शकतात. त्यामुळे कामातून वेळ काढून आराम करा.

डोक्यावर ताण वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. दीर्घ श्वास घ्या, योगा, जिम, वॉकिंग मुळे स्ट्रेस कमी होतो. गाणी ऐका, मेडिटेशवन करा.

जास्तीत जास्त शांत ठिकाणी रहा. गोंगाट किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. स्वतःला वेळ द्या.

Related Stories

लेसर उपचारांचा दिलासा

Omkar B

मुलांना धोका नाहीच

Amit Kulkarni

जाणून घ्या ‘ग्रीन टी’ पिण्याचे अनेक फायदे

Kalyani Amanagi

एन्डोस्कोपीच्या अंतरंगात….

Omkar B

जपानी वॉटर थेरपी

tarunbharat

मातीच्या भांड्यातील अन्न का खावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!