Tarun Bharat

अशी घ्या पावसाळ्यात पायांची काळजी

तरुणभारत ऑनलाइन

पावसाळा सर्वांनाच हवाहवासा वाटतो.वातावरणातील थंडावा आणि निसर्ग सौदर्य सर्वांनाच आवडते. पण पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच तो अनेक आजार घेऊन येतो.विशेष म्हणजे पावसाळ्यात आपला सतत पाण्याशी संपर्क येत असतो.त्यामुळे आपले पाय खराब होतात.दूषित पाण्यामुळे फंगल इन्फेकशन होऊन पायांना खाज येते.आणि तुमचे पाय खराब होऊ शकतात. अशावेळी आपल्या पायांची काळजी घेतली नाही तर इन्फेकशन वाढून तुमच्या पायांचे सौंदर्य कमी होते.म्हणूनच हे टाळण्यासाठी जाणून घ्या पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी.

१. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी दिवसातून तीन वेळा पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे.यानंतर पाय पुसून कोरडे करून घ्यावेत.

२.झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.पायांना आराम मिळेल.अशाने भेगांमध्ये,नखांमध्ये अडकलेली माती निघून जाईल. पाय गरम पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर, पुसून कोरडे करावेत आणि त्यावर मॉइश्चराईजर लावून मसाज करावा.

३.पावसाळ्यात चांगली पावसाळी चपला वापरा. शूज वैगरे घालणे टाळा. शूजमुळे पाणी साचून पाय खराब होऊ शकतात. त्यामुळे पायांचे आजार उद्भवण्याची शक्यता जास्त असते. शक्यतो बंद शूज, मोजे घालणे टाळावे.

४. बाहेर अनवाणी फिरू नये. कारण चिखलापासून विविध त्वचा विकार होण्याची शक्यता असते.

५.पावसाळ्यात सातत्याने पायाची नखं काढत राहायला हवीत.कारण नखांमध्ये माती साचून संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी नखांची स्वच्छताही फार गरजेची आहे.

६. पायाला सूज येत आहे असे वाटत असेल तर तुरटीच्या कोमट पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा.यामुळे नक्कीच आराम मिळेल.बराच वेळ आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या टिप्स नुसार तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेतली तर नक्कीच तुमचे पाय निरोगी राहू शकतात. त्यासोबत त्यांचे सौंदर्य देखील वाढेल.

Related Stories

‘मारबर्ग’ व्हायरसने आफ्रिकेत 9 जणांचा मृत्यू,WHO ने बोलावली तातडीची बैठक

Archana Banage

55 लाखात वाढविली 2 इंच उंची

Patil_p

Cinnamon Benefits : स्वयंपाकघरातील दालचिनी महिलांसाठी उपयुक्त; ‘हे’ आहेत फायदे

Abhijeet Khandekar

मुलांमधील बध्दकोष्ठता

tarunbharat

नेब्युलायजरची संजीवनी

Omkar B

चांदोली धरणातून विसर्गाला सुरवात : वारणा नदी काठच्या गावांना इशारा, धरण ८३ टक्के भरले

Abhijeet Khandekar