Tarun Bharat

पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

काही दिवसातच पावसाळा सुरु होईल.आणि पाऊस म्हंटल की भिजणं आणि मस्ती करणं आलचं.पण पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात,त्वचा निस्तेज दिसू शकते. तसेच, यामुळे वारंवार मुरुम फुटू शकतात.त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, तवचेच संरक्षण कसं करावं यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

भरपूर पाणी प्या आणि मेकअप टाळा

फक्त पावसाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत भरपूर पाणी प्यायला हवं.भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडू शकतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका मिळू शकते.तसेच मुबलक पाणी पिल्यामुळे त्वचा निखळ होते.

मेकअपचा कमी वापर करा
पावसाळ्यात आद्रतेचं प्रमाण वाढलेलं असतं यामुळे त्वचेची रोम छिद्रे बंद होतात.आणि यामुळे चेहऱ्यावर फुटकुळ्या, मुरूम येतात.आणि त्यात जर मेकअप केला तर त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही यामुळे त्वचाविकार ही उद्भवू शकतात.यामुळे या दिवसात शक्यतो मेकअप करणं टाळलं पाहिजे.

तेलकट पदार्थचं सेवन टाळा

पावसाळा म्हंटल की गरमागरम चटपटीत पदार्थ खाऊ वाटतात.पण तेलकट पदार्थ खाल्यामुळे मुरुमांचे प्रमाण वाढू शकते. त्याचबरोबर त्वचानिस्तेज दिसू लागते.

तुमची त्वचा टोन करा

आद्रतेमुळे त्वचेची रोम छिद्रे उघडी असल्याने पुन्हा धूळ साचून मुरुम फुटू शकतात. म्हणून,टोनिंग आवश्यक आहे. यासाठी लिंबाचा रस, काकडीचे पाणी आणि ग्रीन टी या नैसर्गिक टोनरचा वापर केला जाऊ शकतो.

दिवसातून २-३ वेळा चेहरा धुवा
पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी दिवसातून किमान २-३ वेळा दिवसातून तीनवेळा चेहरा धुवा. यामुळे आपल्याला बुरशीजन्य संसर्ग टाळण्यास देखील मदत करेल.

या लहान-लहान गोष्टींची आपण काळजी घेतली तर पावसाळ्यात आपण हेल्दी त्वचा मिळवू शकतो.

Related Stories

सामना विषम ज्वराचा

Amit Kulkarni

सिंड्रोम एक्स म्हनजे काय ?

Omkar B

जाणून घ्या; पावसाळ्याच्या सुरवातीला कोणता आहार घ्यावा

Abhijeet Shinde

‘नव्याने’ जिमला जाताना…

Omkar B

मॉर्निंग वॉक करताना

Amit Kulkarni

कोरोना काळात उपयुक्त गॅजेट

Omkar B
error: Content is protected !!